अकोट फैल भागात एका स्वस्त धान्य दुकानाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:10+5:302021-06-22T04:14:10+5:30
पालकमंत्र्यांनी खरेदी केला ८०० रुपयांचा गुटखा शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत भगवती नामक दुकानातून पालकमंत्र्यांनी प्रति पाकीट ८०० ...
पालकमंत्र्यांनी खरेदी केला ८०० रुपयांचा गुटखा
शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत भगवती नामक दुकानातून पालकमंत्र्यांनी प्रति पाकीट ८०० रुपयांप्रमाणे दोन पाकीट आरएमडी गुटखा विकत घेतला. एका वाहनात गुटखा असल्याची माहिती दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून सिटी कोतवाली व जुने शहर पोलिसांना देण्यात आली. काही वेळाने पोलीस तेथे आले, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर पातूर येथे एका दुकानातून पालकमंत्र्यांनी ९ हजार रुपयांचा गुटखा विकत घेतला. तसेच एका बँकेत जाऊन पीक कर्ज वाटपाची तपासणी केली, असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी तपासणी!
जिल्ह्यात प्रशासनावर अंकुश असावा, तसेच लोकाभिमुख प्रशासनाचा प्रयत्न म्हणून वेषांतर आणि नाव बदलून तपासणी केली, अशी माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. गुटखा विक्रीसंदर्भात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, दोषींवर कारवाई होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.