वऱ्हाडी भाषेच्या जतनासाठी विठ्ठल वाघांनी केली पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:01 AM2020-01-19T11:01:27+5:302020-01-19T11:01:36+5:30

प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते.

Vitthal wagh try hard to save Varhadi language! | वऱ्हाडी भाषेच्या जतनासाठी विठ्ठल वाघांनी केली पायपीट!

वऱ्हाडी भाषेच्या जतनासाठी विठ्ठल वाघांनी केली पायपीट!

Next

- नीलिमा शिंगणे-जगड 
 
अकोला: अवघ्या महाराष्ट्राला आपल्या कवितांनी वेड लावणारे लोककवी विठ्ठल वाघ. सिनेमा, गीत, गद्य-पद्य, ललित अशा साहित्याच्या प्रकारांमध्ये विठ्ठल वाघांनी सफर केली आहे; मात्र वºहाडी भाषा चिरकाल टिकावी, यासाठी त्यांनी पायपीट केली. वाघ यांनी जवळपास ३३ तालुक्यांचा दौरा करू न, म्हणी व शब्द गोळा केले. सुमारे २५ हजार वºहाडी शब्दांचा त्यांनी संग्रह केला आहे. वºहाडी ही मराठीची मायकूस आहे. त्यामुळे वºहाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे काम वयाच्या पंचाहत्तरीत डॉ. वाघ करीत आहेत, हे येथे उल्लेखनीय. आज प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांचा रविवार, १९ जानेवारी रोजी अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे.
प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते. २००० ते २००५ पर्यंत त्यांनी प्राचार्यपद भूषविले. विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस करीत असल्याने आजही ते विद्यार्थीप्रिय आहेत. याची साक्ष अमृतमहोत्सवी सोहळ्याला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हजेरी लावत आहेत.
वाघ यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भाषेची समृद्धी तिच्या शब्दसंख्येवर अवलंबून असते. ज्या भाषेत शब्द अधिक, ती भाषा समृद्ध. मराठीत सुमारे सव्वालाख शब्द आहेत. डॉ. वाघ वºहाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत.
सुमारे २५ हजार वºहाडी शब्दांचा संग्रह त्यांनी केला आहे. वºहाडी, अहिराणी, मराठवाडी, कोकणी अशा विविध बोलींमध्ये असलेले असंख्य शब्द प्रमाणभाषेत दिसत नाही. या शब्दाचा कोश करू शकलो, तर बोली भाषेसोबतच मराठी भाषा समृद्ध होईल. महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यातील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करू न, काही म्हणी व शब्द गोळा केले. वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाजप्रबोधन केले. अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम केले. वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक बालभारतीचे संपादन प्रमुख होते.

गीत, पटकथा व संवाद लेखन
मराठी चित्रपट ‘अरे संसार संसार’ यामधील ‘काळ्या मातीत मातीत...तिफण चालते’ या डॉ. विठ्ठल वाघ यांच्या गीताला गीत लेखनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवकीनंदन गोपाला चित्रपटाचे गीत, पटकथा, संवाद लेखनास पुरस्कार, राघू मैना चित्रपटाची पटकथा, संवाद, लेखन, शंभू महादेवाचा नवस चित्रपटाचे गीत लेखन, दूरचित्रवाणीवरील काज या मालिकेचे पटकथा, संवाद लेखन, गोट्या या अजरामर मालिकेचेदेखील पटकथा आणि संवाद लेखन डॉ. वाघ यांनी केले.


संमेलनाध्यक्ष
पुण्याचे औंध साहित्य संमेलन, पहिले महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, नववे कामगार साहित्य संमेलन, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन, अंबाजोगाई येथील बोली साहित्य संमेलन, मुखेड येथील मायबोली साहित्य संमेलन, देहू येथील दुसरे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन, कारंजा लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन, सोळावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, चांदुर रेल्वे येथील चौथे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन, सोलापूर येथील पाहिले कृषी साहित्य संमेलन, संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन.

Web Title: Vitthal wagh try hard to save Varhadi language!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.