विवरा गाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:08+5:302021-05-25T04:21:08+5:30

पातूर : तालुक्यातील विवरा गावात १५ दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. गावात कोरोना तपासणी केल्यावर ...

Vivara village on the way to coronation! | विवरा गाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर!

विवरा गाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर!

googlenewsNext

पातूर : तालुक्यातील विवरा गावात १५ दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. गावात कोरोना तपासणी केल्यावर ५०च्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, ग्रामस्थांनी गाव १०० टक्के बंद ठेवून काेरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी झाली आहे. आता विवरा गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.

गावात जनजागृती व्हावी व ग्रामस्थांच्या मनातील भीती घालविण्यासाठी ग्रामपंचायतीचे सचिव पी. पी. चव्हाण यांनी ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जनजागृती केली. गावातील किराणा दुकाने, पीठ गिरण्यांसह सर्व दुकाने बंद ठेवून गावात १०० टक्के संचारबंदी लागू केली. या संचारबंदीला गावकऱ्यांनीही प्रतिसाद दिला. कोरोनाबाधित रूग्णांनी विलगीकरणात राहून घरीच उपचार घेतले. त्यामुळे ९० टक्के रूग्ण बरे झाले. गावच्या सचिवाने प्रयत्न केले तर गाव कोरोनामुक्त होते, हे विवरा गावावरुन दिसून आले. ग्रामसेवक, सरपंच, गावातील सुज्ञ ग्रामस्थांची एकजूट असली तर गावावर येणारे संकट टळण्यास मदत होते. विवरावासीयांच्या एकजुटीमुळे गाव कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामसचिव, लोकप्रतिनिधी, तलाठी, सरपंच, पोलीसपाटील, गावातील सुज्ञ ग्रामस्थ कोरोनाला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहेत.

फोटो:

===Photopath===

240521\img-20210516-wa0296.jpg

===Caption===

विवरा

Web Title: Vivara village on the way to coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.