तहसील कार्यालयांमध्ये लागणार मतदार याद्या!
By admin | Published: January 24, 2017 02:34 AM2017-01-24T02:34:49+5:302017-01-24T02:34:49+5:30
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूक
संतोष येलकर
अकोला, दि. २३- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या मंगळवारी तहसील कार्यालयांमध्ये लावण्यात येणार आहेत.
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात विभागात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी विभागातील २0८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत मतदानाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या माहितीसाठी मतदार याद्या संबंधित तहसील कार्यालयांमध्ये लावण्यात येणार आहेत. या मतदार याद्यांद्वारे पदवीधर मतदारांना मतदार अनुक्रमांक, मतदारांचे नावे आणि मतदान केंद्राची माहिती उपलब्ध होणार आहे.
२ लाख १0 हजारांवर मतदार !
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम मतदार यादी ७ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार २ लाख १0 हजार ५११ पदवीधर मतदार आहेत.
मतदारांचे नाव, मतदान केंद्र शोधण्यासाठी 'सर्च इंजीन' !
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांमधील पदवीधर मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र तातडीने शोधण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयांमध्ये ह्यसर्च इंजीनह्ण सुरू करण्यात येणार आहे.