मतदार नोंदणी ३ ऑक्टोबरपासून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:13 AM2017-09-19T01:13:36+5:302017-09-19T01:13:36+5:30
अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत राज्यात ३ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

१ जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात ३ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र आणि मतदार यादीत नावे नसलेल्या नवमतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये नोंदविण्यासाठी मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे नियोजन अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने मतदार नोंदणी कार्यक्रम तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आला असून, मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
तसेच मतदार नोंदणीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांपैकी रिक्त जागा असलेल्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांची (बीएलओ) नेमणूक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.