मतदानाच्या प्रशिक्षणाला ९३ कर्मचाऱ्यांची दांडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:26 PM2019-10-14T12:26:09+5:302019-10-14T12:26:16+5:30
या प्रशिक्षणात १ हजार ३९१ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाºयांनी सहभाग घेतला असून, ९३ कर्मचाºयांनी मतदानाच्या प्रशिक्षणाला दांडी मारली.
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाºयांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात १ हजार ३९१ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाºयांनी सहभाग घेतला असून, ९३ कर्मचाºयांनी मतदानाच्या प्रशिक्षणाला दांडी मारली.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकांतील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेचे दुसरे प्रशिक्षण १३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार राहुल वानखडे यांनी प्रशिक्षणाला उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’द्वारे मतदान प्रक्रियेसह अभिरूप मतदान (मॉक पोल) प्रक्रियासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. मतदानाच्या या प्रशिक्षणाला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील एकूण १ हजार ४८४ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांपैकी १ हजार ३९१ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी उपस्थित होते. उर्वरित ९३ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाºयांनी मात्र प्रशिक्षणाला अनुपस्थित राहत प्रशिक्षणाला दांडी मारली. मतदानाच्या प्रशिक्षणाला दांडी मारणाºया संबंधित कर्मचाºयांना निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत सोमवारी नोटीस बजावण्यात येणार असून, स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सोमवारी नोटीस बजावण्यात येणार आहे व त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्यात येणार आहे.
-विजय लोखंडे,
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला पूर्व मतदारसंघ.