२०५५ सदस्यांना निवडून देणार मतदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:01+5:302020-12-30T04:25:01+5:30

अकोला: जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या २ हजार ५५ सदस्यांना ...

Voters to elect 2055 members! | २०५५ सदस्यांना निवडून देणार मतदार!

२०५५ सदस्यांना निवडून देणार मतदार!

Next

अकोला: जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या २ हजार ५५ सदस्यांना मतदार निवडून देणार आहेत. त्या अनुषंगाने मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामपंचायतींच्या २ हजार ५५ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायती अंतर्गत मतदार २ हजार ५५ उमेदवारांना ग्रामपंचायतींचे सदस्य म्हणून निवडून देणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांच्या भूमिकेकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडून द्यावयाच्या ग्रामपंचायत सदस्यांची अशी आहे संख्या!

तालुका ग्रा.पं. सदस्य

तेल्हारा ३४ ३२१

अकोट ३८ ३३६

मूर्तिजापूर २९ २४९

अकोला ३६ ३४९

बाळापूर ३७ ३४८

बार्शिटाकळी २७ २४३

पातूर २३ २०९

...........................................................

एकूण २२४ २०५५

गावागावांत बैठकांचे सत्र!

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्य संख्याबळ मिळविण्यासाठी गाव पुढाऱ्यांकडून पॅनलची निर्मिती आणि उमेदवारांची निवड करण्याकरिता गावागावांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

Web Title: Voters to elect 2055 members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.