बार्शिटाकळी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये मतदान शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:16+5:302021-01-16T04:22:16+5:30
बार्शिटाकळी तालुक्यातील तालुक्यातील एरंडा ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली. ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अनेक गावात ...
बार्शिटाकळी तालुक्यातील तालुक्यातील एरंडा ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली. ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अनेक गावात दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांनी मतदान हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणूक गावात प्रतिष्ठेची असल्याने घरातून मतदार काढण्यासाठी कार्यकर्ते जोमाने भिडले होते. मतदानप्रक्रियेमध्ये अडचणी दूर करण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून सात तलाठी, तर क्षेत्रीय अधिकारी म्हणून सहा मंडळ अधिकारी तसेच ३८४ कर्मचारी कार्यरत होते. मतदान केंद्रांवर कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता बार्शिटाकळी पोलीस स्टेशन ठाणेदार पवार व पिंजर ठाणेदार पडघन तथा पोलीस कर्मचारी तैनात होते. मतदानप्रक्रियाकरिता उपविभागीय अधिकारी मोहिते, तहसीलदार गजानन हामंद,नायब तहसीलदार शिव हरी थोंबे, यांनी कामकाज सांभाळले.