‘व्हीआरडीएल’ने गाठला ३ लाख चाचण्यांचा टप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:22+5:302021-06-26T04:14:22+5:30
अद्यावत उपकरणांमुळे होतेय वेळेची बचत तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांमधून विषाणूचा ‘आरएनए’ वेगळा केला जातो. या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो; मात्र ...
अद्यावत उपकरणांमुळे होतेय वेळेची बचत
तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांमधून विषाणूचा ‘आरएनए’ वेगळा केला जातो. या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो; मात्र यासाठी उपलब्ध अद्यावत उपकरणामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होत आहे. त्यामुळे कमी वेळेत जास्त चाचण्या करणे शक्य झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्फत चार आरटीपीसीआर मशीन आणि आरएनए एक्सट्रॅक्शन मशीन प्राप्त झाल्याने चाचणीची क्षमताही वाढली.
दुसऱ्या लाटेतील चाचण्यांची स्थिती
महिना - चाचण्या - पॉझिटिव्ह अहवाल
फेब्रुवारी - २१०५७ - ४,४३७
मार्च - ४९७५९ - ८,६५०
एप्रिल - ४९४९५ - ८,४२०
मे - ६१६७१ - १०,३७९
जून - २०,३३८ - १०५६
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह जिल्हा प्रशासन, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी जगभिये व जीएमसी प्रशासनाच्या सहकार्याने स्वॅब चाचणीचे कार्य युद्धपातळीवर करणे शक्य झाले. सर्वाधिक चाचण्या मागील सहा महिन्यात करण्यात आल्या आहेत.
- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, जीएमसी, अकोला