वाडी अदमपूर-तेल्हारा मार्ग खड्डेमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:43+5:302021-07-20T04:14:43+5:30

अदमपूर: वाडी अदमपूर-तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

Wadi Adampur-Telhara road is rocky! | वाडी अदमपूर-तेल्हारा मार्ग खड्डेमय!

वाडी अदमपूर-तेल्हारा मार्ग खड्डेमय!

Next

अदमपूर: वाडी अदमपूर-तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

वाडी अदमपूर-तेल्हारा हा मार्ग सहा कि.मी. असून, वाडी अदमपूर गावापासून २ कि. मी. मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाने वाडी अदमपूर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाडी अदमपूर-तेल्हारा मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरूच असते. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे.

---------------------------

वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असून, रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

-रूपेश राठी, सरपंच, वाडी अदमपूर.

----------------------------

वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. रस्त्यावरील खड्डे दोन दिवसांत बुजविण्यात येतील. तसेच एका महिन्याच्या आत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळेल.

-संजय बोचे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तेल्हारा.

------------------

वाडी अदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे. नागरिक त्रस्त झाले असून, संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.

- मीरा बोदडे, सरपंच, इसापूर.

-------------------------

या गावांतील नागरिकांची वर्दळ

वाडी अदमपूर-तेल्हारा मार्गावरून वाडी अदमपूर, जाफ्रापूर, इसापूर, उकळी बाजार, उकळी बु., वरुड वडनेर, वागरगाव, बाभुळगाव, तळेगाव पा. आदी गावांचे नागरिक तालुक्याच्या ठिकाणी या रस्त्यावर ये-जा करतात. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रमाणात वर्दळ असते.

Web Title: Wadi Adampur-Telhara road is rocky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.