१०८ रुग्णावाहिकेसाठी वेटिंग, दररोज ५० पेक्षा कॉल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:16 AM2021-04-19T04:16:51+5:302021-04-19T04:16:51+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका व्यस्त झाली आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका व्यस्त झाली आहे. रुग्णवाहिकेसाठी कंट्रोल रुमवर येणाऱ्या कॉलची संख्या वाढली आहे, मात्र रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जिल्ह्यातील ७ हजार ४४१ रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली असून, यामध्ये १५६४ कोविड रुग्ण, तर ५ हजार ८७७ नॉनकोविड रुग्णांना सेवा दिल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. मोहम्मद फैजान जहागीरदार यांनी दिली. जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या १६ असून यामध्ये चार कार्डिॲक, तर १२ बेसिक लाईफ सर्पोट रुग्णवाहिका आहेत. कार्डिॲक्ट रुग्णवाहिका ही अकोला जीएमसी, बाळापूर आरएच, मूर्तिजापूर आणि अकोट ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. तसेच बेसिक लाईफ सर्पोट सर्पोट रुग्णवाहिका ही पातुर, आलेगाव, बार्शिटाकळी, पिंजर, माना, गांधीग्राम, हिवरखेड, पोपटखेड, उरळ, तेल्हारा, बाडेगाव, जिल्हा स्त्री रुग्णालयात कार्यरत आहे. हिवरखेड येथील रुग्णवाहिका आरकेटी आयुर्वेद महाविद्यालयात सेवा देत आहे.
कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक
महिना कोरोना रुग्ण - इतर रुग्ण
जानेवारी - ५६ - २२००
फेब्रुवारी - ४६८ - १७६३
मार्च - १०४० - १९१४
जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका
१६
दररोज येणारे कॉल्स
७५ टक्के
शहरातून येणारे कॉल्स
२५ टक्के
कॉल केल्यानंतर अर्ध्यातासात रुग्णवाहिका हजर१०८ रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. अनेकदा कॉल केल्यानंतर ३० मिनिटात रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत हजर होते, मात्र काही वेळा वेटिंगवर राहावे लागत असल्याने रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागते.
शहरी भागात रुग्णवाहिका वेळेत मिळत असली, तरी अनेक जण खासगी रुग्णवाहिकेचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याचे दिसून येते. असे असले तरी शहरी भागात कोविड रुग्णांसाठी १०८ रुग्णावाहिकांचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसून येतो.
गत तीन महिन्यात कोविडच्या तुलनेत नॉनकोविड रुग्णांनी १०८ रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे. बहुतांश वेळा १०८ रुग्णवाहिका वेळेत पोहोचत असली, तरी ट्रॅफिकमुळे रुग्णवाहिका येण्यास ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत लागत असल्याचे चित्र दिसून येते.
ग्रामीणमधून १०८ रुग्णवाहिकेला मागणी
ग्रामीण भागात खासगी रुग्णवाहिका नसल्याने १०८ रुग्णवाहिका ही एकमेव सेवा आहे. त्यामुळे १०८ रुग्णसेवेला बहुतांश कॉल्स ग्रामीण भागातून येत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात १०८ सह १०२ रुग्णवाहिकेचा देखील रुग्णांना मोठा आधार आहे.