घरकुल योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:13+5:302020-12-23T04:16:13+5:30

----------- बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य बोरगाव मंजू : येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहक-चालकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले ...

Waiting for the benefit of Gharkul scheme | घरकुल योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

घरकुल योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

Next

-----------

बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

बोरगाव मंजू : येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहक-चालकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरगाव मंजू येथे परिसरातील खेड्यापाड्यांच्या नागरिकांची गर्दी होते. परिसरात स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

----------

तेल्हारा शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था

तेल्हारा : शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकास वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

-------------

पणज परिसरात हरभऱ्याचे पीक संकटात

पणज : परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक संकटात सापडले आहे. हरभऱ्यावर अळींचे आक्रमण वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. अळींच्या बंदोबस्तासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

----------------

नाल्या तुंबल्या; आरोग्याला धोका

आलेगाव : नियमित सफाई करण्याबाबत उदासीनता असल्याने नाल्या घाण, कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे गावात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आलेगावची लोकसंख्या पाच हजाराच्यावर आहे. नाल्यांची गेल्या अनेक दिवसांपासून साफसफाईच झाली नाही. नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.

---------------

Web Title: Waiting for the benefit of Gharkul scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.