शेतक-यांना तूर मोजणीची प्रतीक्षा

By admin | Published: June 18, 2017 01:58 AM2017-06-18T01:58:26+5:302017-06-18T01:58:26+5:30

नाफेडची तूर खरेदी बंद; तेल्हारा तालुक्यातील नोंदणी केलेले २७00 शेतकरी वंचित.

Waiting for farmers to count the tire | शेतक-यांना तूर मोजणीची प्रतीक्षा

शेतक-यांना तूर मोजणीची प्रतीक्षा

Next

अनिल अवताडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तूर खरेदीचा निर्णय घेतला; पण या खरेदीचा काहीच ताळमेळ नसल्याने शासनाचा तूर खरेदीचा निर्णय शेतकर्‍यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. तालुक्यामधील अजूनही नोंदणी केलेले २७0५ शेतकरी तूर मोजणीचा नंबर लागल्याच्या फोनची वाट बघत आहेत. शेतकर्‍यांची ४५000 क्विंटल तूर घरात पडून आहे.
शेतकर्‍यांच्या तुरीच्या मालाला बाजारात योग्य तो भाव मिळत नसल्याने शासनाने ५,0५0 रुपये या भावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांनासुद्धा समाधान वाटले; पण हा निर्णय आपल्या जीवावर उठेल, अशी कल्पनाही शेतकर्‍यांना नव्हती. कारण शासनाचे तूर खरेदीबाबतचे वेळोवेळी बदलत गेलेले नियम व अटी तसेच तूर खरेदी बंद-चालू या ना त्या मार्गाने मध्यंतरी येणारे अडथळे हे सर्व शेतकर्‍यांवरच लादले गेले. त्यामुळे शेतकर्‍यांना मनस्ताप किंवा आर्थिक फटका बसला. तूर खरेदीची सबएजंट म्हणून खरेदी-विक्री संस्था काम पाहत आहे. या संस्थेने तूर खरेदीमध्ये कशा पद्धतीने तूर खरेदी केली, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच एकदा २७ तर दुसर्‍यांदा १६३ निकृ ष्ट दर्जाची तूर आल्याने खरेदी केलेली तूर अकोला येथील वेअर हाउसमधून परत आली. बाजार समितीला नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांना क्रमानुसार टोकन देणे बंधनकारक आहे. त्यामुळे खरेदी सुरू असताना बाजार समितीने ८५ टोकन दिले. पैकी ३८ शेतकर्‍यांच्या तुरीचे मोजमाप झाले. नंतर तूर खरेदी बंद झाली; पण दिलेल्या टोकनपैकी ४७ शेतकर्‍यांजवळ टोकन व नंबर असूनही तूर मोजल्या गेली नाही व नोंदणी केलेल्या २७0५ शेतकर्‍यांना बाजार समितीने मोजमापाकरिता फोन करून आपली तूर मोजणीकरिता घेऊन या, असा फोन करणे व फोन केल्यानंतर शेतकरी आल्यास त्यांना टोकन देणे, असे बंधनकारक आहे; पण नाफेडने तूर खरेदी बंदचा आदेश दिल्याने गेल्या एक महिन्यापासून नोंदणी केलेले शेतकरी फोन येण्याची वाट पाहत आहेत.

२ जूनपासून खरेदी बंद आहे. जोपर्यंंत शासनाचा आदेश येत नाही, तोपर्यंंत तूर खरेदी करता येणार नाही.
- वसंतराव बोडखे,
व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था, तेल्हारा.

शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अनेक दिवसांपासून मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पेरणीच्या काळात त्याने विकलेल्या मालाची रक्कम त्याला मिळाली नाही, याचे दु:ख आहे. तत्काळ तूर खरेदी सुरू करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावावा.
- सुरेश तराळे,
सभापती, कृ षी उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा.

Web Title: Waiting for farmers to count the tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.