हातरुण येथे ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:39+5:302020-12-11T04:45:39+5:30
शासनाने लाखो रुपये खर्च करून हातरुण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली आहे. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हातरुण, खंडाळा, ...
शासनाने लाखो रुपये खर्च करून हातरुण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली आहे. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हातरुण, खंडाळा, गायगाव, मोरगाव, अंदुरा अशी पाच उपकेंद्र असून, अंदुरा, सोनाळा, बोरगाव वैराळे, हातरुण, मालवाडा, शिंगोली, खंडाळा, मांजरी, टाकळी निमकर्दा, गायगाव, मनाडी, बोराळा, बोरवाकडी, मोरगाव सादिजन, हसनापूर, अडोशी आणि कडोशी या अठरा गावांत हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्यसेवा पुरवली जाते. आरोग्यवा अधिक जलद गतीने उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामीण रुग्णालयाची मागणी करण्यात आली आहे.
बाळापूर तालुक्यातील हातरुण गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या जवळपास आहे. हातरुण येथून बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण २८ किमी आहे. बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालय आहे. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेले अकोला ते हातरुण अंतर हे ३२ किमी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून हातरुण येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्याची मागणी शिंगोली सरपंच महेश बोर्डे, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, ज्ञानदेव गावंडे, संतोष गव्हाळे, पंकज सोनोने, अमोल चौधरी, अतुल हेलगे, गोपाल सोनोने, विजय चोरे, अमित काळे, ओम वेते यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.