दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:27+5:302021-05-05T04:29:27+5:30

लसीकरणाच्या दोन मोहीम कोविड लसीकरण मोहीम ही केंद्र आणि राज्य शासनामार्फत स्वतंत्र राबविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना लस न ...

Waiting for the second dose is over; Vaccination will start from Thursday! | दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ!

दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ!

Next

लसीकरणाच्या दोन मोहीम

कोविड लसीकरण मोहीम ही केंद्र आणि राज्य शासनामार्फत स्वतंत्र राबविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना लस न मिळाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

राज्य शासनाची मोहीम

१ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात झाली. या गटासाठी राज्य शासनाकडून लसीचा पुरवठा केला जात असून, यामध्ये केवळ १८ ते ४५ याच वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाणार आहे.

केंद्र शासनाची माेहीम

४५ वर्षावरील वयोगटातील लाभार्थींसाठी केंद्र शासनाकडून लस पाठविण्यात येत असून, या गटातील पहिला व दुसरा डोस या लसीच्या साठ्यातून दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या केंद्रावर १८ ते ४५ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण सुरू आहे, अशा केंद्रावर नियोजन नसेल, तर ४५ वर्षांवरील लाभार्थींना लस दिली जाणार नसल्याची माहिती आहे.

बुधवारी केंद्र शासनामार्फत लस मिळणार आहे. यामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारपासून ४५ वर्षांवरील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात होईल.

- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला.

Web Title: Waiting for the second dose is over; Vaccination will start from Thursday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.