घराची भिंत कोसळून चिमुकला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:44 AM2017-10-31T01:44:22+5:302017-10-31T01:45:39+5:30
मळसूर : येथे ३0 ऑक्टोबरच्या दुपारी १.३0 ते २ वाजताच्या सुमारास घराची भिंत अंगावर कोसळून पाच वर्षीय चिमुकला बालक ठार झाला आहे.
Next
ठळक मुद्देकार्तिक भीमराव गुडदे असे मृत बालकाचे नाव उपचार सुरू असताना कार्तिकचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मळसूर : येथे ३0 ऑक्टोबरच्या दुपारी १.३0 ते २ वाजताच्या सुमारास घराची भिंत अंगावर कोसळून पाच वर्षीय चिमुकला बालक ठार झाला आहे.
कार्तिक भीमराव गुडदे असे मृत बालकाचे नाव असून, तो दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो रस् त्याने घराकडे परत येत असताना रामेश्वर दुर्गाआप्पा यांच्या घराची मातीची भिंत अचानक त्याच्या अंगावर कोसळली. त्यामुळे कार्तिक गुडदे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्याला अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना कार्तिक गुडदेचा मृत्यू झाला.