वामनदादांचे साहित्य ‘समग्र वामन’ म्हणून प्रकाशित होणार!

By admin | Published: September 13, 2016 02:46 AM2016-09-13T02:46:25+5:302016-09-13T02:46:25+5:30

हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार; वामनदादांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमातही होणार अंतर्भाव!

Wamanadad literature will be published as 'Om Parmar Vaman' | वामनदादांचे साहित्य ‘समग्र वामन’ म्हणून प्रकाशित होणार!

वामनदादांचे साहित्य ‘समग्र वामन’ म्हणून प्रकाशित होणार!

Next

सिद्धार्थ आराख
मेहकर(जि. बुलडाणा), दि. १२: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली समतेची चळवळ घरा-घरात पोहोचविण्यासाठी तसेच बाबासाहेबांचा मानवमुक्तीचा लढा ज्यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मनामनात पेरण्याचे काम केले, असे लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य ह्यसमग्र वामनह्ण म्हणून राज्य शासन प्रकाशित करणार आहे. तसेच लवकरच वामनदादांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमातसुद्धा अंतर्भाव करण्यात येणार आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीवर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या कार्यासन अधिकारी वर्षा जोशी यांनी साहित्य व संस्कृती मंडळाला तसे पत्र देऊन उचित कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
देशातील शोषित, पीडित, मागास समाजाला समानतेची वागणूक मिळावी, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा लढा उभा केला. तत्कालीन परिस्थितीत लोककवी वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही सामाजिक चळवळ लोकरंजनातून समाज प्रबोधन करीत महाराष्ट्राच्या घरा-घरात व लोकांच्या मना-मनात पेरण्याचे काम केले. लोकांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या मार्गाने चालण्याचा संदेश दिला. आजही लोककवी वामनदादा कर्डक यांचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य अप्रकाशित आहे.
माणसा -माणसाच्या मनातील विषमतेची दरी दूर करण्याचे काम हे साहित्य आजही किती उपयुक्त आहे, हे हेरून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य शासनाकडे लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य ह्यसमग्र वामनह्ण नावाने प्रकाशित करण्याची मागणी केली होती. या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या मराठी भाषा विभागाने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाला पत्र लिहून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीनुसार वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य समग्र वामन म्हणून शासनाच्यावतीने प्रकाशित करण्याची कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

Web Title: Wamanadad literature will be published as 'Om Parmar Vaman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.