मळसूर-चान्नी परिसरात लांडग्याचा हैदोस
By admin | Published: March 2, 2016 02:52 AM2016-03-02T02:52:05+5:302016-03-02T02:52:05+5:30
महिलांसह १२ जखमी; २५ जनावरांवरही हल्ला.
खेट्री/मळसूर: पातूर तालुक्यातील खेट्री-मळसूर परिसरात सोमवरी रात्री लांडग्याने अक्षरश: धुमाकूळ घालत ग्रामस्थांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात महिलांसह १२ जण जखमी झाले असून, लांडग्याने २५ जानवरांनाही लक्ष केले. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला लांडग्यांचा हैदोस मंगळवारी सकाळी थांबला.
आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत मळसूर-चान्नी परिसरात सोमवार रात्री लांडगा आला. त्याने प्रथम ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा जनावरांकडे वळविला. जवळपास २५ जनावरे जखमी झाली. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली.
लांडगा ठार
वनपरिक्षेत्र कर्मचारी, अधिकार्यांसह यांची यंत्रणा आज दखल घेऊन घटनास्थळी दाखल झाली. मळसूर-सायवणी परिसरात लांडग्यांनी हल्ला केल्याची माहिती मंगळवारी ८ वाजता मिळाली होती. माहिती मिळताच कर्मचार्यांसह धाव घेऊन लांडग्याचा शोध घेतला. गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. देवरे यांनी दिली.