प्रभाग १५ : भाजप, सेना, राष्ट्रवादीत तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 10:40 PM2017-02-16T22:40:33+5:302017-02-16T22:40:33+5:30

या प्रभागात भारिप बहुजन महासंघाने चार पैकी एकाही जागेसाठी एकही उमेदवार दिला नसून काँग्रेसने केवळ दोन जागांवर उमेदवार दिले आहेत.

Ward 15: Tripuri in BJP, Army, NCP | प्रभाग १५ : भाजप, सेना, राष्ट्रवादीत तिरंगी लढत

प्रभाग १५ : भाजप, सेना, राष्ट्रवादीत तिरंगी लढत

googlenewsNext

अकोला, दि. १५- प्रभागांची पुनर्रचना होऊन एकत्र आलेल्या गोरक्षण रोड परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. या प्रभागात भारिप बहुजन महासंघाने चार पैकी एकाही जागेसाठी एकही उमेदवार दिला नसून काँग्रेसने केवळ दोन जागांवर उमेदवार दिले आहेत.
विद्यमान नगरसेवक बाळ टाले, भाजप व कल्पना गावंडे यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रभाग क्र. ३१ आणि गोपी ठाकरे व करुणा इंगळे यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रभाग क्र. ३२ मधील बहुतांश भागाचा समावेश नव्या प्रभाग क्र. १५ मध्ये आहे. या भागावर भाजपची मजबूत पकड असल्यामुळे विरोधी पक्षांनीदेखील कंबर कसली आहे. मनपा निवडणुकीच्या रिंगणात या प्रभागातून ह्यअह्ण प्रवर्गासाठी भाजपच्यावतीने शारदा रणजित खेडकर, शिवसेनेच्या सावित्री झांबरे, राष्ट्रवादीकडून कल्पना गावंडे, तसेच अपक्ष उमेदवार मुस्कान पंजवाणी निवडणूक लढवत आहेत. ह्यबह्ण प्रवर्गात भाजपच्या मनीषा रवींद्र भन्साली, शिवसेनेच्या महेक सबलानी, राकाँच्या भाग्यश्री झटाले, मनसेच्या उषा साबळे, काँग्रेसच्या अपर्णा अरुण गावंडे व अपक्ष मीना चौधरी उभ्या आहेत. ह्यकह्ण प्रवर्गातून भाजपचे बाळ टाले यांचा सामना शिवसेनेच्या लक्ष्मण पंजाबी, मनसेचे पंकज साबळे व राकाँचे अनुज तापडिया यांच्यासोबत होईल. ह्यडह्ण प्रवर्गात भाजपचे दीप मनवानी यांची लढत शिवसेनेचे योगेश अग्रवाल, काँग्रेसचे सचिन लटुरिया व राकाँचे निशिकांत बडगे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले व अपक्ष गोपी ठाकरे यांच्यासोबत होणार आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार पाहता या ठिकाणी ह्यडह्ण प्रवर्गात अपक्ष उमेदवारांकडून कडवे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आव्हान उभे केले जाण्याची चिन्हं आहेत.

Web Title: Ward 15: Tripuri in BJP, Army, NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.