प्रभाग १८ मध्ये भारिप, सेना, राष्ट्रवादीत लढत
By admin | Published: February 17, 2017 02:35 AM2017-02-17T02:35:47+5:302017-02-17T02:35:47+5:30
शिवसेना वसाहतीमध्ये भारिप-बमसं, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे.
अकोला, दि. १६- शिवसेनेच्या नेत्यांचा दबदबा असताना जुने शहरातील या वसाहतीला शिवसेना वसाहत म्हणून ओळख मिळाली; बायपास नगर, पंचशीलनगर, गीता नगर, हामजा प्लॉट, स्नेहनगर, गंगानगर आणि शिवसेना वसाहतीचा भाग या प्रभागात समाविष्ट आहे.या निवडणूकीत येथे भारिप-बमसं, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे.
मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यअह्ण प्रवर्गात भारिपकडून गीता गजानन गवई, काँग्रेसकडून सुमन कळसकर, शिवसेनेकडून सपना नवले, राष्ट्रवादीकडून अरुणा सरकटे आणि एक असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने रिपाइं आठवले गटाला येथे एक जागा सोडली असून येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांची पत्नी स्मिता निवडणूक रिंगणात आहे. ह्यबह्ण प्रवर्गात भारिपकडून अब्दुल मुक्कदर, शिवसेनेकडून संतोष दुतोंडे, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक राजू गाढे, भाजपकडून अमोल गोगे, मनसेकडून रमेश पाचपोर, काँग्रेसकडून नासीर खान आणि एक अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यकह्ण प्रवर्गात राष्ट्रवादीकडून अब्दुल शबाना परवीन, भाजपकडून जयश्री दुबे, भारिपकडून मंगला घाटोळे, काँग्रेसकडून कसीमाबी खा, समाजवादीकडून नजिया बेगम, शिवसेनेकडून कमल सांगळूदकर, एमआयएमकडून शाहिस्ता परवीन आणि अपक्ष चार असे एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खुल्या ह्यडह्ण प्रवर्गात भारिपकडून माजी नगरसेवक अब्दुल रऊफ, राष्ट्रवादीकडून दिलीप देशमुख, भाजपकडून पंढरी दोरकर आणि काँग्रेसकडून फिरोज खान, शिवसेनेकडून अजय वाळसकर आणि अपक्ष चार असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.