अकोला जिल्ह्यात गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:25 AM2020-08-18T10:25:04+5:302020-08-18T10:25:19+5:30
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, वीज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात गुरुवार, २० आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार गुरुवारपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, वीज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सोमवार, १७ रोजी सकाळी ७ वाजता ८९.८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच मोर्णा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, इतरही प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे.
प्रकल्प क्षेत्रामध्ये पर्जन्यमान होऊन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबत नदीकाठच्या गावांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबंधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहावे, तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.