जिल्ह्यात ८ एप्रिलपर्यंत वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा
By प्रवीण खेते | Published: April 6, 2023 05:36 PM2023-04-06T17:36:00+5:302023-04-06T17:36:42+5:30
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता: शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन
अकोला: जिल्ह्यात शनिवार ८ एप्रिलपर्यंत विजांचा कडकडाट अन् वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा प्रादेशीक हमामान नागपूर विभागातर्फे देण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
प्रादेशीक हवामान विभाग, नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात ८ एप्रिल पर्यंत ३० ते ४० किलो मीटर गतीने वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा. बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे. यासुचनांचे पालन करावे असे आवाहन नायब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.