सावधान...व्हाॅटस् ॲप होतोय हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:24 AM2020-12-21T11:24:46+5:302020-12-21T11:27:00+5:30

WhatsApp is being hacked सायबर सेलकडे व्हाॅट्सॲप हॅक झाल्याच्या राेजच्या दहापेक्षा अधिक तक्रारी येत आहेत.

Warning ... WhatsApp is being hacked | सावधान...व्हाॅटस् ॲप होतोय हॅक

सावधान...व्हाॅटस् ॲप होतोय हॅक

Next
ठळक मुद्देई-मेल हॅक केली जात आहेत; त्याचप्रमाणे व्हाॅट्सॲपही सध्या हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे.सायबर सेलकडून यावर तत्काळ ताेडगाही काढण्यात येत आहे.

अकोला : स्मार्टफाेनमधील व्हाॅट्सॲप जेवढे साेयीचे झाले आहे, तेवढीच डाेकेदुखीही त्यामुळे वाढल्याचे आता समाेर येत आहे. सायबर सेलकडे व्हाॅट्सॲप हॅक झाल्याच्या राेजच्या दहापेक्षा अधिक तक्रारी येत असल्याची माहिती समाेर आली आहे. सायबर सेलकडून यावर तत्काळ ताेडगाही काढण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे एखाद्याची फसवणूक हाेण्याचा धाेका आहे. विशेष म्हणजे, व्हाॅट्सॲप हॅक झाल्याचा मेल संबंधित व्यक्तीस येत असल्याचीही माहिती आहे.

मोबाइल वापरणारे बहुतांश ग्राहक हे सर्वच प्रकारच्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त व्हाॅट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु, ज्याप्रमाणे बँक खाती, सोशल मीडिया, ई-मेल हॅक केली जात आहेत; त्याचप्रमाणे व्हाॅट्सॲपही सध्या हॅक होण्याचे प्रमाण वाढले असून, अकोल्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये दररोज आठ ते दहा तक्रारी येत आहेत. मात्र, या तक्रारींचे तत्काळ निराकरण होत असल्यामुळे पोलिसांकडून यामध्ये कुठलीही तक्रार नोंदविली जात नाही. आर्थिक फसवणुकीसारखे गुन्हे नसल्यामुळे या प्रकारांवर पाेलिसांकडून तातडीने उपाययाेजना करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर वारंवार जनजागृती करून ते साेशल मीडिया वापरासंदर्भात माहिती देत आहेत. व्हाॅट्सॲप हॅकिंगच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या नसल्याने तसेच आर्थिक फसवणुकीचा धाेकाही नसल्यामुळे पाेलीस गुन्हा दाखल न करता त्यावर तत्काळ उपाय शाेधून तक्रारकर्त्यांचे निरसन करीत आहेत. या प्रकाराची चाैकशी सायबर सेलकडून करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक चुका किंवा अन्य काही कारणांमुळे हे हाेत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

 

असे होते व्हाॅट्सॲप हॅक

ॲण्ड्रॉइड मोबाइलमधील व्हाॅट्सॲप अचानकपणे बंद होते. त्यावर कुठले मेसेज येत नाहीत किंवा कुठले मेसेज जातही नाहीत. कितीही प्रयत्न केला तरी चॅट ओपन होत नाही. मात्र दोन दिवसानंतर हे ॲप आपाेआप ओपन होते. ॲप ओपन झाल्यानंतर त्यावर अनोळखी व्यक्तींचे असंख्य मेसेज येऊन पडतात. यावर अश्लील मेसेजेस येतात त्यामुळे फसवणूक हाेण्याचा धाेका आहे.

काय आहे उपाय

आपले व्हाॅट्सॲप हॅक होऊ नये यासाठी सायबर पोलिसांकडून व्हाॅट्सॲपच्या संदर्भात एक सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्या सूचनांचे पालन केल्यास आपले व्हाॅट्सॲप कधीच हॅक होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी व्हाॅट्सॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट फोल्डरमध्ये ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ची प्रक्रिया पूर्ण केल्यास व्हाॅट्सॲप हे कधीच हॅक होणार नाही किंवा त्याचा दुरूपयोगही कोणालाही करता येणार नाही.

 

या प्रकारामुळे राेजच्या तक्रारी येत आहेत. व्हाॅट्सॲप हॅक हाेऊ नये यासंदर्भात माहिती देत आहोत. व्हाॅट्सॲप हॅक होऊ नये यासाठी सायबर पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच त्याचा प्रचार-प्रसारही करण्यात येत आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन केल्यास होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

- विजय शिंगोडे, पोलीस निरीक्षक सायबर कक्ष

 

मोबाइलमध्ये असलेले व्हाॅट्सॲप अचानक बंद पडले हाेते. मेसेज येणे-जाणे बंद झाले हाेते. मात्र त्यानंतर अचानक व्हाॅट्सॲप सुरू झाले आणि अनाेळखी व्यक्तीचे मेसेजेस तसेच अश्लील मेसेजेस येत हाेते. याचा फार त्रास झाल्याने तसेच संभाव्य धाेका लक्षात घेता सायबर पाेलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी तत्काळ उपाययोजना करून दिलासा दिला.

- उमेश लखाडे, तक्रारकर्ते

Web Title: Warning ... WhatsApp is being hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.