‘सवरेपचार’मधील अतिदक्षता विभाग वार्यावर
By Admin | Published: September 26, 2014 01:51 AM2014-09-26T01:51:11+5:302014-09-26T01:51:11+5:30
अकोला सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रूग्णांना संसर्गाचा धोका.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वार्यावर आहे. अतिदक्षता विभागात चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर उपचार सुरु असताना या ठिकाणी रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक वाट्टेल तेव्हा प्रवेश करीत असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
अतिदक्षता विभागामध्ये गंभीर आजारी रुग्णांवर उपचार करण्यात येतात, या रुग्णांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासाठी या विभागात कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. रुग्णांना भेटण्यासाठी एक वेळ नातेवाईकांना देणे आवश्यक आहे. मात्र सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक वाट्टेल तेव्हा प्रवेश करी त असल्याने या रुग्णांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या विभागातील रुग्णांना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्यास त्यांच्याशी वाद घालण्यात येत असल्याने या विभागामध्ये जाण्यास कुणालाही रोखण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णांना भेटण्यासाठी जाणार्या नागरिकांच्या शरीरावर व क पड्यावर असलेले विषाणू रुग्णांच्या शरीराला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.