वाशिम नगर परिषद उपाध्यक्ष हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

By Admin | Published: March 20, 2015 12:18 AM2015-03-20T00:18:19+5:302015-03-20T00:18:19+5:30

आठ आरोपींचा होता समावेश, न्यायालय परिसरासह शहरात तगडा बंदोबस्त.

Washim city council vice president acquitted all accused in murder case | वाशिम नगर परिषद उपाध्यक्ष हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

वाशिम नगर परिषद उपाध्यक्ष हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

googlenewsNext

वाशिम : वाशिम नगर परिषदेचे उपाध्यक्ष गंगुभाई हाजी बद्रुद्दीन बेनिवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील सर्व आठही आरोपींची सबळ पुराव्याअभावी १९ मार्च रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. खटल्याची संवेदनशिलता विचारात घेऊन न्यायालय परिसरासह संपूर्ण शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाशिम नगर परिषदेचे उपाध्यक्ष गंगुभाई बेनिवाले हे २५ फेब्रुवारी २0१३ रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास दुचाकीने एका नगरसेवक मित्रासोबत मन्नासिंह चौक परिसरात फेरफटका मारण्यास गेले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी बेनिवाले यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे बेनिवाले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. याची फिर्याद नगरसेवक मोहम्मद जावेद यांनी वाशिम पोलिस स्टेशनला रात्री एक वाजता दिली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून सतिष उर्फ गल्ला वानखेडे, गजानन लांडगे, दिनेश भानुशाली , विठ्ठल उर्फ स्वप्निल दळवी, राहूल भांदुर्गे, नितीन मडके, विनोद ढगे व सुरज उर्फ रंजीत काकडे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १४७, १४८, १४९, ३0२, २0१, तसेच आर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करुन दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने याप्रकरणी सर्व आठही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले, तर बचाव पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. फिर्यादीने या प्रकरणाची फिर्याद रात्री उशीरा अनेक लोकांशी संपर्क साधून, चर्चा करून दिली, असे दिसून आल्याने फिर्याद संशयास्पद आहे. प्रत्यक्षदश्रींचे नाव फिर्यादीत नमूद नसून तपास अधिकार्‍याने त्यांची जबानी दोन दिवसउशीरा घेतली, त्यामुळे ते विश्‍वासार्ह नाही. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर गुन्हयात झाल्याचे सिद्ध होत नाही. बचाव पक्षाने मांडलेल्या या बाबी न्यायालयाने मान्य केल्या. १८ घाव होवून बेनिवाले यांचा मृत्यू झाला असताना आरोपींचा सहभाग गुन्ह्यात आहे, हे सरकार पक्षाला सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. खटल्याच्या निकालाच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, अशांतता पसरु नये, यासाठी पोलिसांनी संपूर्ण वाशिम शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. शहरातील अनेक व्यवसायीक प्रतिष्ठाने व लहान मोठी दुकाने आज बंद होती. रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात होती.

Web Title: Washim city council vice president acquitted all accused in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.