वाशिम जिल्हाधिका-यांनी रोखले बीडीओ व अभियंत्यांचे वेतन
By Admin | Published: December 9, 2015 02:50 AM2015-12-09T02:50:18+5:302015-12-09T02:50:18+5:30
धडक सिंचन कार्यक्रमातील १५00 विहिरी अर्धवट; वारंवार सूचना देऊनही सुधारणा नाही.
संतोष वानखडे / वाशिम:धडक सिंचन कार्यक्रमांतर्गतच्या विहीर बांधकामाकडे दुर्लक्ष करणार्या गटविकास अधिकारी व अभियंत्यांचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी २0 नोव्हेंबर काढल्याने आणि डिसेंबरचे वेतन न निघाल्याने, प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली. वारंवार आढावा घेऊनही १५0५ अर्धवट विहिरी ह्यजैसे थेह्ण असल्याच्या अहवालावरून सदर आदेश काढल्याचे बोलले जात आहे.
शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला सिंचनाची जोड देऊन भरघोस उत्पादन काढण्याच्या उद्देशातून धडक सिंचन कार्यक्रम राज्य शासनाने अमलात आणला. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात सन २00९-१0 मध्ये एकूण ७८00 विहिरींचे उद्दिष्ट मिळाले होते. आतापर्यंंत ५२२६ विहिरी पूर्ण केल्या असून, उर्वरित २५७४ विहिरी अपूर्ण असल्याचे आढावा बैठकीतून निदर्शनात आले. अपूर्ण विहिरींपैकी धडक सिंचन कार्यक्रमातून रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग केलेल्या १२६0 विहिरी व अनुदानात वाढ केलेल्या २४५ विहिरी पूर्ण करावयाच्या आहेत, तसेच १0६९ रद्द करावयाच्या विहिरींपैकी २६५ विहिरी पुनर्जीवित करणे प्रस्तावित आहे. गत चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात नरेगामध्ये १२६0 व अनुदानात वाढ झालेल्या २४५ अशा एकूण १५0५ विहिर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना वारंवार दिले होते; मात्र चार महिन्यानंतरही परिस्थिती ह्यजैसे थेह्ण असल्याचे निदर्शनात आले, तसेच विहिरींची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महिनानिहाय नियोजन सादर करण्याचे सुचवूनही अद्याप सदर नियोजन संबंधितांनी सादर केले नाही. रद्द विहिरींपैकी पुनर्जीवित करावयाच्या विहिरींचे लाभार्थीनिहाय माहिती सादर झाली नाही. विहिरींच्या प्रगतीबाबतचा अहवाल नियमित येत नसल्याने वरिष्ठांकडे माहिती सादर करण्यास अडचणी येतात. या सर्व दिरंगाईला जबाबदार असणार्या जिल्ह्यातील सहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु सिंचन व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदींना कामगिरीत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र सुधारणा झाली नसल्याने वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली.