वाशिमचा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळय़ात
By admin | Published: August 14, 2015 11:08 PM2015-08-14T23:08:16+5:302015-08-14T23:08:16+5:30
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी घेतली तीन हजार रूपयांची लाच.
वाशिम : वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्हय़ात आरोपी न करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक सुनिल माटु महाजन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एका गुन्हय़ात आरोपी न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुनिल महाजन हा तीन हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार एका तक्रारकर्त्याने एसीबीकडे दिली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक व्ही.एम. अव्हाळे, पोलीस निरीक्षक ए.जी. रुईकर, एन.बी. बोर्हाडे आणि कर्मचार्यांनी सापळा रचून, पोलीस उपनिरीक्षक सुनिल महाजन यास सिव्हील लाईन परिसरात १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ वाजता तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.