वाशिमच्या सोया कंपनीला ३५ लाखाने गंडविले !

By admin | Published: May 25, 2014 11:12 PM2014-05-25T23:12:41+5:302014-05-26T00:24:14+5:30

वाशिम येथील ‘नर्मदा सॉल्वेक्स’ तब्बल ३५ लाख ८७ हजाराने गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Washim soya company was ruined by 35 lakh! | वाशिमच्या सोया कंपनीला ३५ लाखाने गंडविले !

वाशिमच्या सोया कंपनीला ३५ लाखाने गंडविले !

Next

वाशिम: देशभरातील कंपन्यांना सोयाबीनच्या ढेपचा पुरवठा करणार्‍या रसेक्स ट्रेडर्सच्या व्यवस्थापकसह अन्य चौघांनी येथील ह्यनर्मदा सॉल्वेक्सह्ण या सोयाबीन तेल, ढेप व आदी पदार्थाची निर्मीती करणार्‍या कंपनीला तब्बल ३५ लाख ८७ हजाराने गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई येथील रसेक्स ट्रेडर्स ही कंपनी देशभरातील विविध कंपन्यांना सोयाबीन ढेप पुरवठा करण्याचे काम करते. या व्यवसायाच्या माध्यमातून रसेक्स ट्रेडर्सचे व्यवस्थापक सतिश मेहता यांचा गेल्या अनेक वर्षापासुन वाशिम येथील नर्मदा सॉल्वेक्स कंपनीसोबत व्यवहार सुरू होता. नर्मदा सोयाबीन कंपनी व मेहता यांच्यामध्ये खरेदी केलेल्या मालाची रक्कम ४५ ते ६0 दिवसामध्ये द्यावी लागेल असा करारनामा झालेला आहे. या करारनाम्याप्रमाणे मेहता वारंवार पैसे चुकते करत आले. पण ह्यबिल्टी पावत्याह्ण मध्ये बदल करून दुसर्‍या कंपनीच्या नावाने पावत्या तयार करून या मालाची दुसरीकडेच विल्हेवाट लावल्याचे नर्मदा कंपनीच्या निदर्शनास आले. या प्रकाराची नर्मदा सॉल्वेक्स कंपनीच्या वतीने अनिल हनुमानदास सोमाणी यांनी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीत रसेक्स ट्रेडर्स चे मालक, रसेक्स ट्रेडर्सचे व्यवस्थापक सतिष मेहता, लोटस ट्रेडर्स, ितरूपती ट्रान्सपोर्ट व श्रीवेंक इन्पेक्स बेंगलोर यांनी संगनमत करून ३५ लाख ८७ हजार ८७९ रूपयाच्या मालाची अफरा तफर करून फसवणुक केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरूध्द भादंविचे कलम ४0७, ४0६, ३२0, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपासासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.

Web Title: Washim soya company was ruined by 35 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.