असली तृतीयपंथींनी केली नकलींची धुलाई..!

By admin | Published: May 8, 2017 02:46 AM2017-05-08T02:46:27+5:302017-05-08T02:46:27+5:30

तृतीयपंथींमधील वाद: महागात पडली वसुली; कपडे फाडून केस कापले!

Washing fake imitation by real stereotype ..! | असली तृतीयपंथींनी केली नकलींची धुलाई..!

असली तृतीयपंथींनी केली नकलींची धुलाई..!

Next

अकोला : बोगस तृतीयपंथी बनून दुकानदारांकडून जबरदस्तीने वसुली करणे तीन युवकांना चांगलेच महागात पडले. बोगस तृतीयपंथी असली तृतीयपंथींनी चांगलेच चोपून काढल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता खुले नाट्यगृहासमोर घडली. असली तृतीयपंथींनी बोगस तृतीयपंथींना चोपच दिला नाही, तर त्यांचे कपडे फाडून केससुद्धा कापून टाकले. असली-नकली तृतीयपंथींमधली फ्रिस्टाइल पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या फ्रिस्टाइलमुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
रविवारी खुले नाट्यगृहासमोरील बाजारपेठेतील गर्दी पाहता, तीन युवकांनी तृतीयपंथींचा वेश धारण केला आणि बाजारात फिरून दुकानदारांकडे त्यांच्यासमोर टाळय़ा वाजविण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागण्यास सुरुवात केली. तृतीयपंथींच्या वेशातील हे तीनही युवक दारूच्या नशेत धुंद होते. दरम्यान, याच रस्त्यावरून असली तृतीयपंथी ऑटोरिक्षामधून जात होते. त्यांना बोगस तृतीयपंथींचे कृत्य दृष्टीस पडले. या तृतीयपंथींनी चालकास ऑटोरिक्षा थांबवायला सांगितला. पाचही तृतीयपंथी ऑटोरिक्षातून उतरले आणि त्यांनी बोगस तृतीयपंथी बनलेल्या तीनही युवकांना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांची धुलाई करण्यास सुरुवात केली. असली तृतीयपंथींकडून तीन युवकांना होत असलेली मारहाण पाहून, नेमका काय प्रकार सुरू आहे, हे नागरिकांना लक्षात आले नाही. बर्‍याच वेळानंतर नागरिकांना असली तृतीयपंथींचे कपडे फाडून त्यांना अर्धनग्न केल्यानंतर सुरू असलेल्या प्रकार लक्षात आला. संतप्त तृतीयपंथींनी एका दुकानातून कैची आणून बोगस तृतीयपंथी बनलेल्या तीनही युवकांच्या डोक्यावरील वाढलेले केस कापून टाकले. युवकांना चांगलाच चोप मिळाल्यानंतर या युवकांनी तृतीयपंथींच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घेत पळ काढला. असली तृतीयपंथींकडून बोगस तृतीयपंथींना मारहाणीची ही पहिली घटना नाही. यापूर्वीसुद्धा बाळापूर रोडवर नागरिकांकडून वसुली करणार्‍या बोगस तृतीयपंथी बनलेल्या दोन युवकांना असली तृतीयपंथींनी चोपले होते.

Web Title: Washing fake imitation by real stereotype ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.