मॉडलिंग जगतात वाशिमच्या ‘शंतनु’ची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:55 PM2018-04-28T13:55:31+5:302018-04-28T14:01:16+5:30

वाशिम :  जेमतेम परिस्थिती असतांना इच्छाशक्ती व मेहनती स्वभावामुळे एका मध्यमवर्गिय कुटुंबातील ‘शंतनु’ने मॉडलिंग जगतात भरारी घेतली असून या क्षेत्रात त्याचा नावलौकीक असल्याचे दिसून येत आहे.

Wasim's 'Shantanu' farewell to modeling | मॉडलिंग जगतात वाशिमच्या ‘शंतनु’ची भरारी

मॉडलिंग जगतात वाशिमच्या ‘शंतनु’ची भरारी

Next
ठळक मुद्देप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शंतनु बाबाराव खिराडे याने मॉडलिंग जगतात आपले नावलौकीक केले आहे. सिव्हील इंजिनिअर झाल्यानंतर अकोला येथे झालेल्या ‘मि. अकोला’ या स्पर्धेत प्रवेश मिळविला.आजच्या घडीला शंतनु अनेक शोंमध्ये परिक्षक म्हणून काम करीत आहे.

- नंदकिशोर नारे  

वाशिम :  जेमतेम परिस्थिती असतांना इच्छाशक्ती व मेहनती स्वभावामुळे एका मध्यमवर्गिय कुटुंबातील ‘शंतनु’ने मॉडलिंग जगतात भरारी घेतली असून या क्षेत्रात त्याचा नावलौकीक असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम येथील बबनराव खिराडे हे सहायक पोलीस उपनिरिक्षक असून त्यांना दोन मुले आहेत. बबनराव यांच्या नोकरीच्या आधारावर चार जणांचे कुटुंबाचा गाडा असतांना आपल्यामधील असलेले गुण व प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शंतनु बाबाराव खिराडे याने मॉडलिंग जगतात आपले नावलौकीक केले आहे. वाशिम येथीलच प्रताप इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झाल्यानंतर अकोला येथे झालेल्या ‘मि. अकोला’ या स्पर्धेत प्रवेश मिळविला. आणि मि. फोटोजनिक अकोला फेस हे टायटल मिळविलं. त्यानंतर शंतनूची मि.अ‍ॅन्ड मिसेस महाराष्टÑ २०१७ या स्पर्धेत निवड झाली व तेथे किताब मिळविला. त्यानंतर एकामागोमाग एक किताब त्याला मिळत गेलेत.  यानंतर फॅशन इंडस्ट्रिज मधल्या लोकांसोबत त्यांचा संपर्क आला व अनेक कलाकारांसोबत काम केले. यामध्ये फॅशन, मॉडलिंग क्षेत्रात युथ आयकॉन तथा मि. वर्ल्ड २०१६ ठरलेले रोहित खंडेलवाल, नॅशनल हेअर कटर जावेद हबीब, कलाकर तथा मॉडेल प्रतिक भड, यशी वर्मा, कॉमेडियन सुनिल पाल यांच्यासोबतच अनेक फॅशन डिझायनर, मॉडेल्स, डायरेक्टरसोबत काम केले. आजच्या घडीला शंतनु अनेक शोंमध्ये परिक्षक म्हणून काम करीत आहे. आता स्वत: अनेक मेट्रो सिटीसह महाराष्टÑातील जिल्६यांमध्ये जावून मि.अ‍ॅन्ड मिस २०१८ या स्पर्धेच्या आयोजन लोणावळा येथे केले. या मध्ये १५ मुले व १५ मुली असे एकूण ३० मॉडेलची निवड करण्यात आली. यामधील काही जणांना चांगली संधी सुध्दा मिळाली. याच शोमधील चैताली पाटील हिला टॉलीवुडमधील शॉर्ट फिल्मसाठी निवड झाली, तर चंद्रपूरची महिमा इम्पेडिलवार हिची व्हिडीओ साँग साठी निवड झाली. यासह अनेकांनी चांगली कामगिरी बजावल्याने त्यांचा त्यांना या क्षेत्रात फायदा होत आहे. या शोमध्ये परिक्षक म्हणून अनेक कलाकार, मॉडेलसह एमटीव्ही स्प्लीटस व्हिला १० फेम मिस निबेदिता पाल होती. आॅडीशनपासून या क्षेत्रात आगमन केले. त्यानंतर जिद्द व मेहनतीने काम केल्याने ११ महिन्याच्या अवधीतच स्वत: कार्यक्रमाचे आयोजन करुन आपले नाव या क्षेत्रात उज्वल करुन वाशिमचे नावलौकीक केले आहे.

 

Web Title: Wasim's 'Shantanu' farewell to modeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम