मनपाच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:31+5:302021-05-11T04:19:31+5:30

शहरातील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला ४५ काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मनपा ...

Waste disposal at Corporation's dumping ground | मनपाच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट

मनपाच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट

Next

शहरातील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला ४५ काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने सदर कामाचा कार्यारंभ आदेश दिला असून, अद्याप भाेड येथील जागेवर घनकचऱ्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. दरम्यान, नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची साठवणूक केली जाते. या ठिकाणी सुमारे दाेन ते तीन एकर परिसरात बायाे मायनिंगद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. या दाेन्ही जागेची साेमवारी महापाैर अर्चना मसने यांनी पाहणी केली. भाेड येथील जागेत खदान असल्‍याचे आढळून आल्‍यावर, महापौर मसने यांनी अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली. त्यानंतर, नायगांव येथील डम्‍पिंग ग्राउंडवर सुरू असलेल्‍या बायो मायनिंगच्‍या कामाची पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर, जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे, अभियंता नरेश बावणे, शैलेश चोपडे, युसुफ खान, आरोग्‍य निरीक्षक प्रवीण खांबोरकर आदी उपस्थित हाेते.

Web Title: Waste disposal at Corporation's dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.