उन्हाचा कडाका अन भारनियमनाचा कहर!

By Admin | Published: May 26, 2014 12:41 AM2014-05-26T00:41:48+5:302014-05-26T01:14:03+5:30

अकोल्यातील भारनियमनमुक्त भागातही अघोषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Wasting of the heat! | उन्हाचा कडाका अन भारनियमनाचा कहर!

उन्हाचा कडाका अन भारनियमनाचा कहर!

googlenewsNext

अकोला: चाळीस डिग्रीच्यावर तापमान व उन्हाच्या कडाक्याने नागरिक होरपळून निघत आहे. त्यातच गत आठ दिवसांपासून शहरात होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा तुटवडा असल्यामुळे भारनियमनमुक्त भागातही अघोषित भारनियमन करण्यात येत असल्यामुळे लहान मुलं व वृद्ध मेटाकुटीस आले आहेत. शहरात एकूण ३९ फिडर आहेत. यापैकी ए,बी,सी,डी, मध्ये येणारे ३३ फिडर भारनियमनमुक्त आहेत तर ई, एफ, जी-१, जी-२, जी-३मध्ये येणार्‍या फिडरवर दोन तासांपासून तर पाच तासांपर्यंत भारनियमन करण्यात येते. शहरातील बहुतांश भाग भारनियमनमुक्त आहे. असे असले तरी गत आठ दिवसांपासून शहरातील भारनियमनमुक्त फिडरवरही अघोषित भारनियमन केले जात आहे. या परिसरातील सकाळी आणि दुपारच्या सुमारास तीन ते चार तास विद्युत पुरवठा खंडित राहतो. जुने शहरामध्ये दररोजच अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. उन्हाचा कडाका वाढतच असल्याने जीवाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे नागरिक घर किंवा कार्यालयात राहणे पसंत करीत आहेत.

Web Title: Wasting of the heat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.