जिल्हय़ावर जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:41 AM2017-08-05T01:41:52+5:302017-08-05T01:45:51+5:30

अकोला : पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.५८ टक्के जलसाठा शिल्लक असून, ही जलपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे. शहराला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी वितरणाचे हे नियोजन महापालिकेने केले असले, तरी आतापासूनच शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. शहराला जोडलेल्या गावांना पाणी मिळत नसून, पाण्याचे असमान वाटप होत असल्याचा आरोपही तेथील नागरिकांनी केला आहे.

Water congestion in the district! | जिल्हय़ावर जलसंकट!

जिल्हय़ावर जलसंकट!

Next
ठळक मुद्देकाटेपूर्णा धरणात १८.५८ टक्केच जलसाठापावसाचीअनिश्‍चितता २00४-0५ ची आठवण!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.५८ टक्के जलसाठा शिल्लक असून, ही जलपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे. शहराला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी वितरणाचे हे नियोजन महापालिकेने केले असले, तरी आतापासूनच शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. शहराला जोडलेल्या गावांना पाणी मिळत नसून, पाण्याचे असमान वाटप होत असल्याचा आरोपही तेथील नागरिकांनी केला आहे.
 काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहर, औद्यागिक वसाहत, मूर्तिजापूर शहर, साठ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणी सोडले जाते. पाच दिवसांपूर्वी १९ टक्क्यावर जलसाठा या धरणात होता. तथापि, वाढते तापमान, बाष्पीभवन, जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाण्याची नासाडी होत असल्याने उपयुक्त जलसाठा १८.५८ टक्क्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातच काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी वाहून आणणार्‍या मुख्य जलवाहिनीचे व्हॉल्व्ह खराब आहेत. 
काटेपूर्णा प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. 
मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ 0.0९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच 0.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात ६.९२ दशलक्ष घनमीटर १६.६९ तर निर्गुणा प्रकल्पात ४.६१ दलघमी म्हणजेच १५.९८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

शहराला कायमस्वरू पी पाण्याची सोय हवी! 
अकोला शहराला केवळ काटेपूर्णा धरणातून पिण्यासाठी जल पुरवठा केला जातो. या धरणात अध्र्यांच्यावर गाळ साचला असून, पावसाच्या सततच्या अन्ििश्‍चततेमुळे शहराला कायमस्वरू पी पाण्याची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी अपर वर्धा किंवा हातनूर येथून सोय व्हावी किंवा वाण धरणातील पाण्यातून अध्र्या शहराची सोय करणे गरजेचे आहे. धरणात पाणी असले, तरीही तेवढेच पाणी सोडले जाते. त्यामुळे किमान १४0 लीटर दरडोही पाणी नागरिकांना मिळणे क्रमप्राप्त आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढे येण्याची गरज आहे.

उद्योगावर परिणाम होणार! 
 या अगोदर २00४-0५ मध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती, तेव्हा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद केला होता. प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा आणखी घसरल्यास औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पाणी बंद करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

२00४-0५ ची आठवण!
२00४-0५ मध्ये जिल्हय़ात पाण्याचा दुष्काळ पडला होता. पाऊस झाला नसल्याने जिल्हय़ातील धरणात जलसाठाच शिल्लक नव्हता. परिणामी, शहरात मोठय़ा प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करू न अकोलेकरांची तहान भागविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला होता. ठिकठिकाणी हायड्रंट लावण्यात आले होते. रेल्वेच्या कर्मचार्‍यांची तहान भागविण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागले होते. तेव्हाही यावर्षीसारखीच काटेपूर्णा धरणाच्या जलसाठय़ाची स्थिती होती.

पावसाचीअनिश्‍चितता 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या नोंदीनुसार त्या भागात यावर्षी २८२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हय़ात यापेक्षा कमी नोंद आहे. या नोंदीनुसार जिल्हय़ात आणखी सरासरी २५ मि.मी. पाऊस कमी आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना सुरू  झाला आहे; पण दमदार पाऊस नसल्याने जिल्हय़ावरील जलसंकट गडद झाले आहे.

शहरासाठी १४0 लीटर दरडोई प्रमाण 
 प्रतिमाणूस, प्रतिदिवस किमान १४0 लीटर पाणी मिळालेच पाहिजे. तथापि, अकोला शहर याला अपवाद आहे. गेल्या १0 वर्षांपासून येथील नागरिक १00 लीटरपेक्षा कमी पाण्यात दिवस काढत आहेत. 

Web Title: Water congestion in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.