६४ गावांमध्ये जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:29 AM2017-08-10T01:29:08+5:302017-08-10T01:29:46+5:30

अकोला : खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ६४ खेड्यांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Water conservation in 64 villages | ६४ गावांमध्ये जलसंकट!

६४ गावांमध्ये जलसंकट!

Next
ठळक मुद्देमहान धरणातून पाणी सोडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

संतोष येलकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ६४ खेड्यांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेंतर्गत गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

एक लाख ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर!
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने, या गावांमधील जवळपास एक लाख ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान! 
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पाणी विकत घेऊन तसेच नदी-नाल्यातील ‘झिर्‍या’तील पाण्यावर तहान भागविण्याची वेळ योजनेंतर्गत गावांमधील ग्रामस्थांवर आली आहे.

उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
-अनिल चव्हाण, प्रभारी उपअभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना गत १२ दिवसांपासून पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने ६0 खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
-दिलीप माहोड, अध्यक्ष, बारुला विभाग, कृती समिती.
 

Web Title: Water conservation in 64 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.