अकोला शहरावर जलसंकटाचे सावट; मनपाकडून १४ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:26 AM2017-12-26T02:26:43+5:302017-12-26T02:26:54+5:30

अकोला :  महान धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता भविष्यात शहरावर जलसंकट घोंघावण्याची  दाट शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने १४  कोटी ६0 लक्ष रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय  आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी  शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. 

Water conservation in Akola city; Proposal of 14 crores by MNP | अकोला शहरावर जलसंकटाचे सावट; मनपाकडून १४ कोटींचा प्रस्ताव

अकोला शहरावर जलसंकटाचे सावट; मनपाकडून १४ कोटींचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांमार्फत प्रस्ताव शासनाकडे

आशिष गावंडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  महान धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता भविष्यात शहरावर जलसंकट घोंघावण्याची  दाट शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने १४  कोटी ६0 लक्ष रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय  आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी  शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. 
यंदा अत्यल्प पावसामुळे महान धरणातील जलसाठय़ात वाढ झाली नसल्याची बिकट परिस्थिती  आहे. आजरोजी महान धरणात १५.३४ टक्के जलसाठा उपलब्ध असून, शहराला आणखी पाच  महिने पाणीपुरवठा होऊ शकत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. त्यानंतर पाणी पुरवठय़ाच्या समस्येत वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. ही बाब गृहीत धरून ऐन वेळेवर धाव पळ नको, या उद्देशातून महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पर्यायी जलस्रोतांची चाचपणी करत  शहरातील नादुरुस्त हातपंप, विहिरी, सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने १४ कोटी ६0  लाखांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रभागांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरींच्या  खोलीकरणासह नवीन विहिरींच्या अधिग्रहणाचा समावेश आहे. 
१६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत महापौर विजय अग्रवाल यांनी संभाव्य  जलटंचाई लक्षात घेता प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत हा प्रस्ताव विभागीय  आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. 

३३३ ठिकाणी नवीन पंप, ४५२ ठिकाणी सबपंप
सद्यस्थितीत नादुरुस्त २५९ हातपंप तसेच ३२६ सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीचा आराखड्यात  समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ३३३ ठिकाणी नव्याने बोअर घेऊन त्यावर हातपंप  लावणे व ४५२ ठिकाणी नवीन बोअरवर सबर्मसिबल पंपांची व्यवस्था केली जाणार आहे. या  कामासाठी ६ कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद प्रस्तावित केली आहे.

महान ते शहरापर्यंत ३६ ठिकाणी बोअर
महान ते अकोला शहरापर्यंत ३६ ठिकाणी बोअर तयार असून, त्यावर अश्‍वशक्तीचे सबर्मसिबल  पंप लावण्यासाठी ७२ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त ६0 विहिरींचा गाळ काढून  त्यांचे खोलीकरण करणे, ४0 नवीन विहिरींचे अधिग्रहण करणे यासाठी १ कोटी ४४ लक्षची तरतूद  करण्यात आली आहे. 

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा; ६ कोटींची तरतूद                
शहरातील २0 प्रभागांमध्ये प्रति प्रभाग ५ टॅँकर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जलप्रदाय  विभागाने तब्बल ६ कोटींची तरतूद केली आहे. यापूर्वी महापालिकेत कागदोपत्री टॅँकर दाखवून  कोट्यवधी रुपयांची देयके लाटण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार यंदाही घडण्याची शक्यता  नाकारता येत नाही.

जलप्रदाय विभागाने तयार केलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. हा प्रस्ताव  शासनाकडे सादर होताच आढावा बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. आ. गोवर्धन शर्मा, आ.  रणधीर सावरकर यांच्या मदतीने पाणीपुरवठय़ाचा निधी मंजूर होईल, हे नक्की.
- विजय अग्रवाल, महापौर
 

Web Title: Water conservation in Akola city; Proposal of 14 crores by MNP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.