जलसंकट आणखी भीषण!

By admin | Published: April 29, 2016 02:06 AM2016-04-29T02:06:38+5:302016-04-29T02:06:38+5:30

अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील केवळ ४.८९ दलघमी जलसाठा.

Water conservation is even worse! | जलसंकट आणखी भीषण!

जलसंकट आणखी भीषण!

Next

राजरत्न सिरसाट /अकोला
अकोला शहराची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात मागील वर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने, यावर्षी एप्रिल महिन्यातच या धरणातील जलसाठय़ाने तळ गाठला. यामुळे अकोलेकरांवरील जलसंकट वाढले आहे. काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक असून, यावर्षी याच धरणातून दोन दशलक्ष घनमीटर जलसाठा खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा १५ जूनपर्यंत अकोलेकरांची तहान भागवणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी उन्हाळा प्रखर असून, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग दररोज १२ ते १५ मि.मी. एवढा आहे. ग्रामीण भागातील जनतेची पाण्याविना होणारी होरपळ बघता, जिल्हा प्रशासनाने काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा- उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा १८ किलोमीटरचा प्रवास असून, ४३ ते ४५ अंश तापमानामुळे नदीपात्र कोरडेठण्ण पडल्याने पात्रातच मोठय़ा प्रमाणात पाणी मुरत आहे.
परिणामी गुरुवारी सांयकाळपर्यंत २४ तास उलटूनही केवळ अर्धे म्हणजे नऊ किलोमीटर अंतरापर्यंतच पाणी पोहोचले होते. हे पाणी पुढे येण्यासाठी आणखी २४ ते ३0 तास लागण्याची शक्यता आहे. या पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी धरणातून आणखी एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागणार असल्याचे वृत्त आहे. असे केल्यास काटेपूर्णात केवळ ३.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असेल. अकोलेकरांना दररोज लागणार्‍या पाण्याची गरज बघता, या साठय़ात १५ जूनपर्यंत त्यांची तहान भागवणे अशक्य आहे.

Web Title: Water conservation is even worse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.