जलसंधर्वनासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी करा!

By admin | Published: January 28, 2015 01:02 AM2015-01-28T01:02:53+5:302015-01-28T01:02:53+5:30

अकोला येथे प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री रणजित पाटील यांचे आवाहन.

Water conservation scheme is successful! | जलसंधर्वनासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी करा!

जलसंधर्वनासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी करा!

Next

अकोला - जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार ही योजना अंमलात येत आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात असून सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी ही योजना यशस्वी करण्याचे आवाहन प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनानंतर पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी केले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते शास्त्री क्रीडांगणावर ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, होमगार्डचे जिल्हा समादेशक विजय उजवणे, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई, आ. गोपीकिशन बाजोरिया यांची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या पथकांची खुल्या जीपमधून पाहणी करून त्यांच्याकडून मानवंदना स्वीकारली. जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनेकरिता एकूण १६२ कोटी ९0 लाख रुपये अथसंकल्पित केले असून, त्यापैकी १00 कोटी ९७ लाखांची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली. खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याकरिता आवश्यक १४५ कोटी २४ लाख रुपयांपैकी ७५ कोटी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यापैकी ७३ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर भाषणात सांगितले. जिल्ह्यातील दोन हेक्टरपेक्षा कमी जमीनधारणा असलेल्या अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना आम आदमी योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पोलीस दल, राज्य पोलीस प्रशिक्षण विभाग, गृहरक्षक दल पुरुष व महिला पथक, एनसीसी मुले व मुलींचे पथक, वाहतूक शाखा, पोलीस दलाच्या मुले, मुलींचे पथक, भारत स्काउट आणि गाइडचे पथक, बँड पथक, श्‍वान पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल पथक, अँब्युलंस यांसह आरोग्य विभागाचे जनजागृती चित्ररथ यांनी उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

Web Title: Water conservation scheme is successful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.