वऱ्हाडावरील जलसंकट होणार गडद; प्रमुख धरणांमध्ये उरला फक्त ३९ टक्केच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:40 PM2017-12-16T18:40:05+5:302017-12-16T18:45:57+5:30
अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.
वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३९.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. १५ डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.८५ टक्के, निर्गुणा ५९.९७, उमा धरणात केवळ ४.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९६.६२ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात ३८.३९ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी १२.८८ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ३२.९५ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५२.२५, मसमध्ये १७.९५ टक्के, कोराडी १९.९७, पलढग ९७.६०, मन १७.२. तोरणा २२७.५० टक्के, तर उतावळी धरणात ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २४.०० टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ३.२५ टक्के, तर एकबुर्जी धरणात २७.८२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात २०.७४ टक्के, अरुणावतीमध्ये १४.६९, तर बेंबळा धरणात १८.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ९९.६७ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.
वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्प
वऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात ४५.५६ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात ४३.१० टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात २९.१० टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही ३९.७८ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. यातील बहुतांश धरणात अर्धा गाळ आहे.