‘वॉटर कप’ स्पर्धा : अकोला जिल्ह्यातील ७५ गावांना इंधन खर्चासाठी १.१२ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:15 PM2018-05-09T15:15:51+5:302018-05-09T15:15:51+5:30
अकोला : पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ७५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी इंधन (डीझल) खर्च भागविण्याकरिता १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.

पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वॉटर कप’ स्पर्धेत जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर व बार्शीटाकळी या चार तालुक्यांतील ७५ गावांनी सहभाग घेतला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या गावांमध्ये मे अखेरपर्यंत कामे करण्यात येणार आहेत. या कामांचा इंधन (डीझल) खर्च भागविण्यासाठी प्रशासनामार्फत दीड लाख रुपये जिल्हा परिषदेमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ७ मे रोजी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या आढावा बैठकीत सांगितले. त्यानुषंगाने वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी चारही तालुक्यांतील ७५ गावांसाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ८ मे रोजी दिला.
तीन दिवसांत ग्रामपंचायतींना निधी वितरित करा!
वॉटर कप स्पर्धेतील ७५ गावांमध्ये कामांसाठी इंधन खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेला निधी संबंधित ग्रामपंचायतींना तीन दिवसांत वितरित करून संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना दिला आहे.