Water cup compitation : नवरदेव-नवरीचे बांधावर श्रमदान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 03:42 PM2019-04-10T15:42:41+5:302019-04-10T15:58:40+5:30

नव्याने लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याने आपल्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी   शिवार गाठून बांधावर जोड्याने श्रमदान केले. 

Water cup compitation: Newly wed couple do 'Shramdan' in the field | Water cup compitation : नवरदेव-नवरीचे बांधावर श्रमदान  

Water cup compitation : नवरदेव-नवरीचे बांधावर श्रमदान  

Next

- सत्यशील सावरकर 
तेल्हारा :  सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेच्या चौथ्या पर्वात तालुक्यातील मनब्दा गावात पाणी फाऊंडेशनचे तुफान आले आहे. गावातील आबालवृद्ध महिला पुरुष श्रमदानात हिरीरीने भाग घेत आहेत.  नव्याने लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याने आपल्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी   शिवार गाठून बांधावर जोड्याने श्रमदान केले. 
तालुक्यातील मनब्दा ग्रामस्थांनी  शेत शिवारात श्रमदान करून पाणी फाऊंडेशनच्या विविध उपाययोजना राबवून गतवर्षी सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता. त्या दरम्यान गावकऱ्यांनी लोकसहभाग व जनजागृती पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवार जलमय व हिरवेगार केले. त्याकामात राहिलेली कसर काढण्यासाठी गाव पुन्हा या वर्षी जोमाने कामाला लागल्याचा प्रत्यय 9 एप्रिल ला लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याच्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी लग्न समारंभातील विधी बरोबरच श्रमदानाला महत्त्व देण्यावरून दिसून येते. येथील भुषण श्रीकृष्ण पाथ्रीकर याचा विवाह वाडेगाव येथील रोषणी हिचे सोबत दि. 9 एप्रिल ला सानंद संपन्न झाला लग्न समारंभ आटोपल्यावर नवरी घरी आल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी घरात नवचैतन्य व नवरी आल्याची धावपळ नान्होरा, वाटमोकळी, वान वाटप इत्यादी कार्यक्रम असतात; परंतु पाण्याचे भविष्यातील महत्त्व जाणून गत वर्षी एकट्याने श्रमदान केले. आता जोड्याने श्रमदान करायचा संकल्प केलेल्या भुषणने दुसर्‍या दिवशी सकाळी गाव शिवारात पाणी फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या श्रमदानाला आपल्या सहचारिणी सोबत हजेरी लावून श्रमदान केले. नवरदेव नवरी बांधावर येवून श्रमदान करत असल्याचे पाहून इतर गावकरी जोमाने श्रमदानाला लागले. त्यामुळे गावात पाणी फाऊंडेशनचे तुफान आल्याचे दिसत आहे. यावेळी गावचे सरपंच, सदस्य, विविध सामाजिक संस्था, संघटना व पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी समन्वयक इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Water cup compitation: Newly wed couple do 'Shramdan' in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.