पावसाचे पाणी संचयासाठी जलशक्ती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:40 PM2019-07-03T15:40:59+5:302019-07-03T15:41:04+5:30
अकोला : पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी राज्यात जलशक्ती अभियानाला सुरुवात झाली आहे.
अकोला : पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी राज्यात जलशक्ती अभियानाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात १ जुलै ते १५ सप्टेंबर दरम्यान पाणी संचयाच्या विविध उपाययोजना करण्यासाठी राज्य स्तरावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. केंद्राच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने या अभियानातील उपक्रम ठरवून दिले आहेत.
राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी केंद्र, राज्य, जिल्हा, पंचायत समिती स्तरावर अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्रालय स्तरावर या अभियानात २५७ उपसचिव, संयुक्त सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी २३ अधिकाºयांना काही जिल्ह्यांची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोबतच राष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थांकडून समाजप्रबोधनही केले जाणार आहे. त्यामध्ये शास्त्रज्ञ, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे तांत्रिक अधिकारीही मार्गदर्शन करणार आहेत. राज्य स्तरावर नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास, पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी दोन अधिकाºयांची नियुक्ती त्यासाठी करणार आहेत. पंचायत समिती स्तरावर ४४७ उपसचिव, संचालक यांच्यासह केंद्रीय पाणी आयोग, केंद्रीय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे तांत्रिक अधिकारी काम करणार आहेत. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी जिल्ह्यांमध्ये हे अधिकारी काम करतील. पावसाळ्यात पाण्याचा संचय करण्यासाठी विविध उपाययोजनांचे मार्गदर्शन तसेच ती कामे करवून घेतली जातील.
दुसºया टप्प्यात १ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये पाणी संचयासाठी केलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन केले जाईल. त्या तपासणीनंतरच अभियानाची फलनिष्पत्ती ठरणार आहे. याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने दिले आहे.