वऱ्हाडातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:29 PM2019-08-01T14:29:51+5:302019-08-01T14:29:57+5:30
अकोला : गत चोवीस तासांत पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे.
अकोला : गत चोवीस तासांत पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धासह अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा व वान धरणातही ही वाढ दिसून आल्याने पाणी वाढण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या २५ जुलैपासून वºहाडात पाऊस सुरू आहे. तथापि, पावसात जोर नसल्याने चिंता वाढली होती. ३० जुलै ते ३१ जुलै पहाटेपर्यंत चांगला पाऊस झाल्याने अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात एका दिवसात ०.२६ टक्के वाढ झाली, तर वान धरणात ४.६३ टक्के वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ३.५ टक्के जो साठा होता, तो आजमितीस ३.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वान धरणात मंगळवारी ३२.२१ टक्के जलसाठा होता, आजमितीस हा साठा ३६.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा १५.९३ वरू न १६.७९ टक्क्यांवर पोहोचला. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पात ३० जुलै रोजी ३०.९७ टक्के जलसाठा होता, तो आजमितीस ४५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात २२.५४ वरू न २३.९० टक्के वाढ झाली. नळगंगा प्रकल्पात ९.३६ वरू न ९.५८ टक्के वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण मध्यम प्रकल्पात ४.७३ वरू न ५.१६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. इतरही सिंचन प्रकल्पात वाढ झाली आहे.
खडकपूर्णात शून्य टक्के साठा!
वऱ्हाडात ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. ३० जुलै रोजी रात्री बºयापैकी पाऊस पडल्याने या सिंचन प्रकल्पामध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, कोराडी, वाशिम जिल्ह्यातील सोनल, अकोला जिल्ह्यातील निर्गृणा व उमा प्रकल्पाचा जलसाठा शून्य टक्के आहे. इतर काही धरणांची पातळी अत्यल्प आहे.
- सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ आशादायक चित्र असून, आता चांगला पाऊस आल्यास जलसाठ्यात पुन्हा वाढ होणार आहे. असे असले तरी आता उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व बचत करणे गरजेचे आहे.
अंकुर देसाई,
अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.