जलवाहिनीला गळती; दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:50+5:302021-06-26T04:14:50+5:30
चाचण्यांची संख्या घसरली! अकाेला : मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, अद्यापही काेराेनाची लागण ...
चाचण्यांची संख्या घसरली!
अकाेला : मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, अद्यापही काेराेनाची लागण हाेत असलेले रुग्ण आढळून येत आहेत. अशा स्थितीत काेराेनासदृश लक्षणे आढळून येत असतानादेखील काेराेना चाचणीकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे समाेर आले आहे. चाचण्यांची संख्या घसरल्याने रुग्णसंख्येत घसरण झाली आहे.
सिमेंट रस्त्याला तडे; दुरुस्तीची मागणी
अकाेला : शहरातील वर्दळीच्या असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला असून, उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. आकाशवाणीसमाेर रस्त्याला माेठी भेग पडली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
सर्व्हिस रस्त्याची दुरवस्था
अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे लाेकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी समाेर आली आहे़
रस्त्यालगत फळांची विक्री
अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूला पायबंद घालण्याच्या उद्देशातून राज्य शासनाचे निर्बंध कायमच आहेत़ दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्यक व इतर गरजू वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे़ त्यानंतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. असे असले तरी जठारपेठ चाैक, काैलखेड चाैक, तुकाराम चाैक आदी परिसरात रस्त्यालगत रात्री उशिरापर्यंत फळांची विक्री केली जाते.
‘उड्डाणपुलाचे काम निकाली काढा !’
अकाेला : जुने शहरातील डाबकी रेल्वे गेट येथे मागील चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे भिजत घाेंगडे कायम आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने अकाेला ते निंबा फाटा, शेगाव, तेल्हारा, तसेच संग्रामपूर तालुक्यात जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीला खाेळंबा निर्माण झाला असून, या पुलाचे काम तातडीने निकाली काढण्याची मागणी हाेत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
दिंडी मार्गाचे भिजत घाेंगडे कायम
अकाेला : मागील काही दिवसांपासून दिंडी मार्गाची दुरुस्ती रखडल्याने अकाेला ते गायगाव ते निमकर्दा ते अडाेशी, कडाेशीमार्गे शेगावला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़ याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाविकांमधून हाेत आहे.