जलवाहिनीला गळती,पाण्याचा अपव्यय सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:34+5:302021-03-04T04:34:34+5:30
नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर ...
नया अंदुरा : कारंजा रमजानपूर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ११ पैकी आठ बोअरवेल कोरडे पडले असून तीन बोअरवेलवर १० गावांना पाणीपुरवठा होत असल्याने १० गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५०-१६० फुटानंतर कडक दगड असल्याने एक-एक करीत बोअरवेल कोरडे पडत आहेत. कारंजा रमजानपुर,नया अंदुरा, शिंगोली,हातला, लोणाग्रा, सोनाळा,निंबा फाटा अंदूरा,आडसूळ व मालवाडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील ग्रामस्थांना भरउन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कारंजा रमजानपुर पाणी पुरवठा योजनेंतर्गत १० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आली होती. या बोअरवेलचे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहोचण्याची व्यवस्था आहे .मात्र कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले आठ बोअरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोअरवेलची पातळी कमी झाली असून ११ पैकी ८ बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. १० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या उपाययोजना न केल्यास मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. ३ बोअरवेलची पाणी पातळी खोलवर जात आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने १० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा जलवाहिनेवरील अनेक लिकेज जोडावे तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुनीता गोरे, शिंगोली सरपंच महेश बोर्डे, शिवसेना नेते उमेश जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र पोहर , जनार्दन साबळे,पं. स. सदस्य अनिरुद्ध देशमुख, माजी सरपंच देवकाबाई साबळे,माजी सैनिक नारायण साबळे, गोविंद थोरात आदींनी केली आहे.
फोटो: