कान्हेरीजवळ जलवाहिनी फुटली

By admin | Published: May 17, 2014 06:36 PM2014-05-17T18:36:00+5:302014-05-17T19:04:07+5:30

काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली;अकोलेकरांवर पुन्हा जलसंकट

The water pipes near Kanheri | कान्हेरीजवळ जलवाहिनी फुटली

कान्हेरीजवळ जलवाहिनी फुटली

Next

बार्शीटाकळी : महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने अकोलेकरांवर पुन्हा जलसंकट उभे ठाकले आहे.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून टाकण्यात आलेली नवीन जलवाहिनी कान्हेरी सरप या गावाजवळ १६ मे रोजी लिकेज झाली. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. शनिवार, १७ मे रोजी सकाळीदेखील या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरूच होती. दोन दिवसांत या जलवाहिनीतून लाखो लिटर्स पाण्याचा अपव्यय झाला आहे. १५ दिवसांपूर्वी जुनी पाईपलाईन दुरुस्त करून कसाबसा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. आता पुन्हा कान्हेरीजवळ पाईपलाईन फुटल्याने अकोलेकरांवर जलसंकट उभे ठाकले आहे. महान ते अकोलादरम्यान असलेल्या या पाईपलाईनची दररोज पाहणी करणार्‍या पथकाची गरज असतानाही तिकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वारंवार ही पाईपलाईन फुटत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Web Title: The water pipes near Kanheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.