वर्हाडातील धरणातील पाणी पिण्यासाठी होणार आरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:42 AM2017-09-12T01:42:24+5:302017-09-12T01:42:24+5:30
अकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क

पावसाळा संपत आला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्हाडातील (पश्चिम विदर्भ) धरणांतील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्यापैकी हजेरी लावली असली तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्याच्या आतच होती. यावर्षी पावसाने दडी मारली आहे. ११ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात १६.८४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.५३, निर्गुणा ३७.३0, उमा धरणात तर 0.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ६७.९९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात १४.९८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ७.१0 टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २0.९३, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १0.७८, पलढग ४0.७५, मन ९.३७, तोरणा ६.४६ टक्के, तर उतावळी धरणात १८.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २९.0६ टक्के, सोनल १.९८ टक्के, तर एकबुर्जी धरणात १५.८७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
अमरावती विभागात ३३.४८ टक्के जलसाठा!
अमरावती विभाग म्हणजेच वर्हाडातील एकूण मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ ३३.४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, सर्वाधिक कमी जलसाठा बुलडाणा जिल्हय़ात ११.८0 टक्के आहे. वाशिम जिल्हय़ात १९.८२ टक्के, अकोला २८.६६ टक्के, यवतमाळ जिल्हय़ात ३२.११ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ५५.८४ टक्के एवढा साठा शिल्लक आहे.
सध्याची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता यापुढे धरणातील पाण्याचे आरक्षण केवळ पिण्यासाठीच राहील. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. पावसाळा अद्याप संपला नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
- अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.