५५६ गावांचा पाणीटंचाई पुन्हा सादर करावा लागेल आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:58+5:302021-03-04T04:33:58+5:30
अकाेला : मार्च महिना लागताच जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल लागली असून मार्च अखेर जिल्ह्यातील ५६६ गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता ...
अकाेला : मार्च महिना लागताच जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल लागली असून मार्च अखेर जिल्ह्यातील ५६६ गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात पाणीटंचाईवरील उपाययाेजनांचा दूसरा टप्पा सुरू हाेताे मात्र ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने सादर केलेला आराखडा खूप मोठा झाला असून पर्जन्यमान व धरणातील जलसाठा लक्षात घेऊन पुन्हा आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले .
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या दोन टप्प्यांतील कृती आराखडा तयार करण्याकरिता पंचायत समित्यांकडून उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप तयार करण्यात विलंब झाला हाेता त्या विलंबानंतर अखेर जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील ५६६ गावांसाठी ११९२ उपाययोजनांचा ३४ कोटी २० लाख रुपये खर्चाचा पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी याच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता त्यामध्ये धरणातील जलसाठा मे अखेर पर्यंत उपलब्ध पाणी याचा विचार करून नियाेजन केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने पर्जन्यमान व धरणातील जलसाठा लक्षात घेऊन पुन्हा आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले .
सहा कुपनलिकांसाठी १३.७५ लाखांची कामे
अकोला : पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील सहा गावांत १३ लाख ७५ हजार ८०६ रुपयांच्या निधीतून सहा कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेला आहे तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर, भोकर, निंभोरा खुर्द, निंभोरा बु. आणि बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे इत्यादी सहा गावांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील मंजूर कामेही रखडलेली!
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून १८ डिसेंबर रोजी मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात जिल्ह्यातील २५ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ३६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत, परंतु पहिल्या टप्प्यात मंजूर कृती आराखड्यातील २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांची कामेदेखील जिल्हा परिषदेत रखडली आहेत.
३१ गावांत हातपंप दुरुस्तीची कामे सुरू!
अकोला: जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये हातपंप दुरुस्तीची कामे सद्यस्थितीत सुरू आहेत.