विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:28 PM2019-03-22T18:28:17+5:302019-03-22T18:28:56+5:30
अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.
अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.
विदर्भात १ लाख ३० हेक्टर संत्रा असून, लिंबाचे क्षेत्र २७ हजार हेक्टरपर्यंत आहे. संपूर्ण राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर,मोसंबी ९० हजार तर लिंबूचे क्षेत्र ५० हजार हेक्टर आहे.यासह इतर फळ झाडांवर यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले.२०१६-१७ व २०१८ मध्ये कमी पाऊस झाल्याने यावर्षी भूजल पातळी घटली. बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.या परिस्थितीत फळ झाडांना पाणीच मिळत नसल्याने झाडे वाळण्याच्या स्थितीत आहेत.ही झाडे टिकवायची असतील तर शेतकऱ्यांनी कोणताच बहार घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. झाडावर फळे जर असतील तर पाणी जास्त लागते. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असेल त्या शेतकºयांनी ठिबक सिंचन करावे, झाडांच्या बुंध्याजवळ गांडूळ खत टाकावे, पाला पाचोळाही टाकावा तसेच ३० मायक्रॉन चे मल्चींग करावे. म्हणजे झाडांचे संरक्षण करता येईल. तसेच पाणी देताना प्रथम एका दांडाने व दुसरी पाळी देताना दुसºयां दांडाने पाणी द्यावे त्यामुळे झाडांच्या दोन्ही बाजुने ओलावा राहील. झाड टिकवता येईल. एप्रिल - मे महिन्यात तापमान वाढणार असल्याने शेतकºयांनी फळझाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- जलस्त्रोत घटल्याने फळझाडांवर परिणाम होत आहे.म्हणून यावर्षी शेतकºयांनी संत्रा,लिंबू व इतर फळांचा बहार न घेता पाण्याचे व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचन,मल्चींग,गांडूळ खत आदीसह कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.
डॉ. दिनेश पैठणकर,
प्रमुख,
लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.