नायगाव परिसरात पाणीटंचाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:18 AM2021-04-17T04:18:15+5:302021-04-17T04:18:15+5:30

श्रीवास्तव चाैकात खोदला खड्डा अकोला: जुने शहरातील श्रीवास्तव चाैकातील कामगार कल्याण मंडळालगत साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचली आहे. ...

Water scarcity in Naigaon area | नायगाव परिसरात पाणीटंचाइ

नायगाव परिसरात पाणीटंचाइ

Next

श्रीवास्तव चाैकात खोदला खड्डा

अकोला: जुने शहरातील श्रीवास्तव चाैकातील कामगार कल्याण मंडळालगत साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचली आहे. याठिकाणी जलवाहिनीच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

‘महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा !’

अकाेला: शिवनी ते नेहरू पार्क चाैक ते खदान पाेलीस ठाणे ते बाबासाहेब धाबेकर फार्महाऊसपर्यंत निर्माणाधीन मिनी हायवेच्या कामाची गती मंदावली आहे. सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण हाेत असताना वाशिम बायपास चाैक, गुरांचा बाजार, मानव शाेरूम तसेच निमवाडी चाैकात रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

डाबकी राेड भागात जलवाहिनी फुटली

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड भागात कामगार कल्याण मंडळ कार्यालयाजवळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे शुक्रवारी समाेर आले आहे़ याठिकाणी सातत्याने जलवाहिनीला गळती लागत असल्याचे दिसून येते. मनपाच्यावतीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे़

मास्क न लावणाऱ्या नागरिकांना दंड

अकाेला: शहरात जिवघेण्या काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा नागरिकांना विसर पडला असून बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी फिरणाऱ्या व ताेंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांविराेधात मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी मनपाने गठीत केलेल्या पथकांनी मास्क न लावणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्याची कारवाई केली.

चाचणीसाठी पुढाकार घ्या !

अकाेला: शहरात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्‍टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेहऱ्यावर मास्‍क आणि हात स्‍वच्‍छ करण्‍यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्‍याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

काेराेनाचे नियम पायदळी

अकाेला: शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.

बसस्थानक परिसरात वाहनांचे अतिक्रमण

अकाेला: शहरात निर्माणाधिन उड्डाणपुलाच्या कामामुळे मध्यवर्ती बस स्थानकात जाणाऱ्या एसटी चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काेराेनामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र असून अशास्थितीत बसस्थानक परिसराला अवैध वाहनधारकांनी विळखा घातल्याची बिकट परिस्थिती आहे. या समस्येकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज आहे़

‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या !’

अकाेला: काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्यावतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. याठिकाणी ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस घेता येत आहे. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाेबतच उन्हापासून संरक्षण व पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.

Web Title: Water scarcity in Naigaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.