खारपाणपट्ट्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; तहान भागविण्यासाठी ‘टँकर-झिऱ्या’वर धाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:31 PM2018-05-11T13:31:03+5:302018-05-11T13:31:03+5:30
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, अकोला व खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करणाºया महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, धरणातून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत खारपाणपट्ट्यातील गावांना गत आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र कुठे चार, कुठे सहा तर कुठे पंधरा दिवसांआड टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाण्यावर तहान भागविण्यासाठी गावागावात टँकर आल्यानंतर पाण्यासाठी टँकरवर ग्रामस्थांची झुंबड होत आहे. टँकरद्वारे अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, तहान भागविण्यासाठी बारुला विभागातील म्हातोडी, आपोती बु. येथील एका शेतातील झिºयाच्या पाण्यावर ग्रामस्थांना धाव घ्यावी लागत आहे.
‘बारुल्या’तील पाणीटंचाईग्रस्त अशी आहेत गावे!
खारपाणपट्ट्यातील ‘बारुला ’ विभागातील १२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये घुसर, घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, मारोडी, खोबरखेड, आपोती बु., आपोती खुर्द, अनकवाडी, आखतवाडा-शामाबाद, सुलतान अजमपूर इत्यादी गावांचा समावेश आहे.
जनावरांची तहान भागविण्याचीही चिंता!
पाणीटंचाईग्रस्त बारुला विभागातील गावांमध्ये जिथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे, तिथे जनावरांना पिण्याचे पाणी कोठून आणणार, याबाबतची चिंता शेतकºयांना सतावत आहे. ‘बारुल्या’तील म्हातोडी गावातील जनावरांची तहान गावानजीक असलेल्या लोणार नाल्यातील झिºयातील गढूळ पाण्यावर भागविली जात असल्याचे चित्र आहे.
पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !
टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरेसे नाही, खारपाणपट्टा असल्याने पिण्यायोग्य पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत पाणीटंचाईग्रस्त बारुला विभागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
टँकरद्वारे पंधरा दिवसांआड पाणी मिळते, ते पुरेसे नाही. त्यामुळे लोणार नाल्यातील झिºयाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. झिºयाजवळ साचलेल्या गढूळ पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी व जनावरांची तहान भागविण्यासाठी करावा लागत आहे.
-छाया प्रकाश इंगळे, कमला इद्रभान इंगळे, म्हातोडी.